Due to the current pandemic situation COVID 19 we are working with reduced staff. Policy related services might take some time, in the interim you can click here for reaching out to us and to know more about COVID-19 related queries, click here
Car Insurance

कार विमा पॉलिसी

नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्तींपासून सरंक्षण:

आपण चोला एम. एस. कार विमा पॉलिसी घेतलीत तर पूर, चक्रीवादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक तसेच दंगल, संप, घरफोडी, चोरी, दहशतवादासारख्या सामाजिक आपत्तींमुळे आपल्या कारच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळू शकते.

अपघातात थर्ड पार्टी व्यक्तीच्या उपचाराचा खर्च:

जर आपल्या कारमुळे घडलेल्या अपघातात कोणत्या थर्ड पार्टी व्यक्तीला इजा अथवा मृत्यू पत्करावा लागला तर त्याच्या उपचाराचा खर्च उचलायची संपूर्ण जबाबदारी कायदेशीरपणे आपली असते पण चोला एम. एस. ची कार विमा पॉलिसी थर्ड पार्टी व्यक्तीच्या उपचारांचा ही खर्च उचलण्यास बांधील आहे.

थर्ड पार्टी व्यक्तीच्या मालमत्तेची वा वाहनाची नुकसान भरपाई:

आपल्या कारमुळे घडलेल्या अपघातामुळे जर कोणा थर्ड पार्टी व्यक्तीच्या वाहनाचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले तर कायदेशीर नियमांनुसार ७,५०००० रुपयांपर्यंत कंपनसेशन देण्यास आपण नियमबद्ध आहात. परंतु त्या खर्चाची जबाबदारी देखील चोला एम एसच्या कार विमा पॉलिसी नुसार घेतली जाते.

१५ लाखांपर्यंतचे कव्हरेज:

अपघात काही सांगून होत नाही. पण तरीही आपली व आपल्या कुटुंबाच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी चोला एम एस ची आहे. आपल्या कारला झालेल्या अपघातात आपल्या कुटुंबास अथवा आपणांस दुखापत अथवा मरण पत्करावे लागले तर रुपये १५ लाखापर्यंतची मदत चोला एम एसच्या कार विमा पॉलिसीतर्फे आपणास व आपल्या कुटुंबास लागू होते.

थर्ड पार्टी कार विमा:

भारतीय मोटार वाहन कायदा १९८८ नुसार रस्त्यावर चालवल्या जाणाऱ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. थर्ड पार्टी विमा नसलेली कार बेकायदेशीर मानली जाते. चोला एम एस चा फोर व्हिलर विमा या सर्व गोष्टींपासून आपल्या फोर व्हिलरचे संरक्षण केले जाईल.

सर्वसमावेशक कार विमा:

सर्वसमावेशक कार विमा संरक्षण ही आपल्यासाठी सर्वांत सोयीस्कर बाब आहे कारण त्यात थर्ड पार्टी कार विम्यात समाविष्ट असलेल्या प्रत्येक गोष्टीचे कव्हर आपल्याला मिळते आणि आपल्या स्वत:च्या कारला आग, तोडफोड अशा संकटांमुळे आपल्या कारला झालेल्या नुकसानाची भरपाई देखील आपल्याला मिळते.

झिरो डेप्रीसिएशन कार विमा :

झिरो डेप्रीसिएशन कार विमा किंवा कव्हर आपल्याला आपल्या कारसाठी जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळविण्यास मदत करते. या विम्यानुसार वाहन चलन किंमतीचा विमा उतरविला जातो जेणेकरून तोटा होण्याची शंकाही उद्भवत नाही.

आपली कार ही आपला आनंद आणि अपार अभिमानाचं प्रतीक आहे. जी आपल्याला मनोसोक्त भ्रमंती करण्याचे स्वातंत्र्य देते. कार खरेदी करणे हा संपूर्ण कुटुंबासाठी नेहमीच एक चांगला भावनिक क्षण असतो, कार विकत घेणं हा तुम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी एक महत्वाचा निर्णय असतो.

एकदा आपण कार विकत घेतली की आपल्या कारची जोखीम आणि अनिश्चिततेपासून संरक्षण करणे हे महत्त्वपूर्ण ठरते. ज्या वेळेस आपली गाडी रस्त्यावर उतरते तेव्हा अपघात, आग, चोरी आणि वाहनाचे नुकसान यासारख्या अनेक अनपेक्षित धोके संभवण्याची शक्यता असते, ज्यामुळे नुकसान होऊन आपल्या कष्टाने मिळवलेले पैसे खर्ची पडतात.

चोला एम एस ही कार विमा पॉलिसी आपले वाहन कोणत्याही दुर्दैवी घटनेपासून आपल्या कारला सुरक्षित करते आणि अशा कोणत्याही घटनेनंतर आलेल्या खर्चाची जबाबदारी उचलते. आता चोला एम एसद्वारे आपल्या कार विमा पॉलिसी कव्हरला बळकट करण्यासाठी त्वरित कार विमा कोट्ससह सर्वोत्तम-अनुकूल अॅड-ऑन मिळवा!

<
Toggle Widget