नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्तींपासून सरंक्षण:
आपण चोला एम. एस. कार विमा पॉलिसी घेतलीत तर पूर, चक्रीवादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक तसेच दंगल, संप, घरफोडी, चोरी, दहशतवादासारख्या सामाजिक आपत्तींमुळे आपल्या कारच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळू शकते.
अपघातात थर्ड पार्टी व्यक्तीच्या उपचाराचा खर्च:
जर आपल्या कारमुळे घडलेल्या अपघातात कोणत्या थर्ड पार्टी व्यक्तीला इजा अथवा मृत्यू पत्करावा लागला तर त्याच्या उपचाराचा खर्च उचलायची संपूर्ण जबाबदारी कायदेशीरपणे आपली असते पण चोला एम. एस. ची कार विमा पॉलिसी थर्ड पार्टी व्यक्तीच्या उपचारांचा ही खर्च उचलण्यास बांधील आहे.
थर्ड पार्टी व्यक्तीच्या मालमत्तेची वा वाहनाची नुकसान भरपाई:
आपल्या कारमुळे घडलेल्या अपघातामुळे जर कोणा थर्ड पार्टी व्यक्तीच्या वाहनाचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले तर कायदेशीर नियमांनुसार ७,५०००० रुपयांपर्यंत कंपनसेशन देण्यास आपण नियमबद्ध आहात. परंतु त्या खर्चाची जबाबदारी देखील चोला एम एसच्या कार विमा पॉलिसी नुसार घेतली जाते.
१५ लाखांपर्यंतचे कव्हरेज:
अपघात काही सांगून होत नाही. पण तरीही आपली व आपल्या कुटुंबाच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी चोला एम एस ची आहे. आपल्या कारला झालेल्या अपघातात आपल्या कुटुंबास अथवा आपणांस दुखापत अथवा मरण पत्करावे लागले तर रुपये १५ लाखापर्यंतची मदत चोला एम एसच्या कार विमा पॉलिसीतर्फे आपणास व आपल्या कुटुंबास लागू होते.